AC / Non AC Rooms
--------------------------------------
Veg / Non Veg Food Available
--------------------------------------
Rent a Car Facility
Plan Your Tour
Festivals in Konkan
   
Festivals in Konkan
----------------------------------------------------------------------------------------------------------
गणेशोत्सव
   
कोकणी आणि सण यांच नात अगदी अतूट आहे. प्रत्येक सण कोकणात मोठया उत्साहाने, भक्तीभावाने आणि विधीवत साजरा केला जातो. कोकणात दिवाळी, तुळशी विवाह, शिमगोत्सव, गणेशोत्सव,नारळी पोर्णिमा, स्थानक जत्रोत्सव फार मोठया प्रमाणात साजरे केले जातात. यातील सर्वात मोठा कित्यंक दिवस घरादाराचे रंगरुप बदलणारा एक आगळवेगळा सण गणेशोत्सव !

गणेशोत्सव कालावधीत घराघरात चैतन्याचे आणि मंगलमय वातावरण असते. गणेश पूजनाचे ठिकाण ठरलेले असते. किंबहुना घर बांधते वेळीच तशी सोय केलेली असते. बरेच गणपती हे घराण्याचे किंवा भावकीचे गणपती असतात. विभाक्त कुटुंबे असली किंवा नोकरी धांद्यानिमित्त वेगवेगळया ठिकाणी स्थायिक झाली असली तरीसुध्दा आपले मुळघर मानून सर्व गणेशोत्सवासाठी अमाप पैसा खर्च केला जातो. वर्गणी काढून किंवा आळीपाळीने प्रत्येक वर्षी गणेर्शोत्सव धुमधडयाक्यात साजरा केला जातो. बाप्पाच्या ससजावटीची, मुर्तीची, नैवेद्याची कमतरता भासू दिली जात नाही. गणपती पाहण्याचे निमंत्रण दिले जाते. वाडया-वाडयांतून आणि गावोगावी गणपती आणि त्यावेळी केलेली आरास पाहण्याचा कार्यक्रम आठ दिवस चालूच असतो. येणा-यांना प्रसाद म्हणून करंज्या दिल्या जातात.

गणेशमूर्ती बनविण्याचे काम सहा महिने आधीच सुरु होते. गणेशमूर्ती बनविण्याच्या उद्योगाला कोकणात गणपतीची शाळा म्हणतात. या व्यवसायासाठी किती नविन्य पूर्ण शब्द वापरला आहे. यावरुन लोकांची गणपती विषयी भावना दिसून येते. या कालखंडात गणपतीची शाळा गजबजून गेलेल्या असतात. तयार गणपतीची मूर्ती फार कमी लोक घेतात. आपल्या पसंती आणि कुवतीनुसार प्रत्येक वर्षी नवीन गणेशमूर्ती आणली जाते. त्यासाठी वर्णन, चित्र, कॅलेंडर, फोटो इत्यादि स्वत:कडील पाटासह कलाकाराकडे दिले जाते. प्रत्येकाच्या मागणीनुसार गणपतीची मूर्ती मूर्तीकार बरवितात. चतुर्थीच्या आधी आठ-दहा मूर्तीना रंगकाम सुरु होते. पूर्वी ब्रशने रंगकाम केले जाई. आता स्प्रे पेंटींग केले जाते. मात्र लहान-लहान नाजूक कामे हाताने केली जातात. अशी प्रत्येक गावात एकतरी गणपतीची शाळा आहेच. साधरपणे 500 रुपयापासून 5 हजार रुपयांपर्यनत घरगुती गणपतीचच्या किंमती असतात.

आनंदी वातावरणात गणपती प्रतिष्ठापना ठिकाणची साफसफाई केली जाते रंग रंगोटी केली जाते. भिंतीवर उत्साही चित्रे काढली जातात.हल्ली डिजीटल बॅनर मिळतात, बजेटप्रमाणे मखर व आसन केले जाते.

कोकणातील बरीचशी मंळळी नोकरीनिमित्त मुंबई किंवा इतरत्र असल्याने त्यांची घरे बंद असतात. मात्र गणेशोत्सव काळात एकही घर बंद नसते. किंबहुना अशी मंडळी आठ दिवस अगोदर गावी येतात. गावातील बाजारपेठाही सजल्या जातात. पुजेचे, मंडपाचे, आराशीचे साहित्य, तोरणे, मखरे, फळे, रंग, फटाके, रिबन इत्यादी साहित्याची दुकानात विजेच्या प्रकाशात रेलचेल सुरु असते. सजवलेली दुकाने रात्री उशीरापर्यन्त उघडी असतात. घराघरात सजावट रात्रभर सुरु असते.

प्रत्येक घरात या काळात चैतन्याचे वातावरण असतसे. सर्वजण समरसतेने काम करतात. गणपतीची प्रतिष्ठापना केल्यावर खीर-मोदकांचे नैवेद्य, आरत्या, भजने असे कार्यक्रम सुरु होतात. सवजण गणरायाच्या सेवेत कग्न असतात. वाडी-वाडीत भजने होतात. सामुदायिक आरत्या होतात. अनंत चतुदर्शीपर्यन्त मंगलमय वातावरण असते. गणेशमुर्तीचे विसर्जनही मोठया थाटामसटात केले जाते.


पारंपारिक नारळी पौर्णिमा उत्सव
   
गणपती उत्सव, शिमगोत्सवाप्रमाणेच कोकणत नारळी पोर्णिमेला फार महत्व आहे. येथील बहुतांश लोक विशेषत: मच्छिमार समाज नारळी पोर्णिमेदिवशी विधीपूर्वक सागराची पूजा करुन गा-हाणेघालतात. सागराला नारळ अर्पण करुन नैवद्य दाखवून पारंपारिक पध्दतीने हा उत्सव साजरा केला जातो. यामुळे खवळलेला समुद्र शांत होतो आणि मच्छिमारी करताना धोका होत नाही. कोणतेही संकट येत नाही, अशी मच्छिमारांची दृढ श्रध्दा आहे. नारळी पोर्णिमेपासूनच मच्छिमारीला सुरुवात करतात. मच्छिमार बांधवांप्रमाणेच या उत्सवात सागर किना-यावर ग्रामस्थही सहभागरी होतात. यावेळी फटाके उडविणे, नौका सजिवणे, कोकणी गाणी म्हणणे, विविध खेळ खेळणे, खेळांच्या स्पर्धा आयोजित करणे इत्यादी कार्यक्रम आयोजित केले जातात.

श्री क्षेत्र कुणकेश्वर
   
कोकणची काशी समजले जाणारे तीर्थ क्षेत्र, रस्त्याने देवगडपासून 15 कि.मी. अंतरावर आहे. कुणकेश्वर मुंबईपासून 453 कि.मी. तर नांदगावपासून 45 कि.मी. अंतरावर आहे. अरबी समुद्राच्या किना-यावर अत्यंत्ा निसर्गरम्य परिसरात हे स्थळ आहे. तेथे शंकराचे मंदिर आहे. देवगडपासून कुणकेश्वरपर्यंत संपूर्ण रस्ता नागमोडी, घाटाचा आणि आमराईतून गेला आहे. वाटेत माडांच्या आणि चिकूच्या बागाही लागतात. देवगडपासून कुणेश्वर पर्यंत रस्तयाने वहानाने जाण्यास 1 तास लागतो. मंदिरापर्यंत जाण्यास उत्तम डांबरी रस्ता आहे. देवगडहून कुणकेश्वरला पायी-पायीही जाता येते. पायी पायी जाण्यास साधारणत: 1 ।। तास लागतो. या मार्गे जाताना 2 कि.मी. आमराइतून गेलेला डांबरी रस्ता, त्यानंतर होडीने ओलांडावी लागणारी सुंदर खाडी, त्यानंतर सुमारे 1 कि.मी. लांबीचा स्वच्छ, पांढरा शुभ्र वाळूचा, निळाशार प्ााण्याचा विस्तीर्ण आणि स्वच्द किनारा आणि उर्वरित प्रवास हा समुद्र किना-यावरून, समुद्र लाटांच्या व मंजूळ आवाजाच्या सानिध्यातून डोंगरातून गेलेल्या पायवाटेचा आहे.

स्वच्छ, सुंदर आणि पांढ-या शुभ्र वाळूची लांबच लांब कातवण गावापर्यंत पसरलेली सुमारे 5 कि.मी. लांबीची किनरपट्टी कुणकेश्वरला लाभली आहे. निसर्गाने कुणकेश्वरला अप्रतिम सौंदर्य बहाल केले आहे. या भागात नारळ, पोफळी, काजूच्या असंख्य राई आहेत. येथे विपुल प्रमाणात मत्स्य संपत्ती आहे. पारंपारिक रापण पध्दतीने येथे मासेमारी केली जाते.

येथील शंकराचे मंदिर म्हणजे शिल्पाकृतीचा आणि स्थापत्य कलेचा उत्कृष्ट नमुनाच आहे. अकराव्या शतकाच्या दरम्यान यादवांनी हे मंदिर बांधल्याचा उल्लेख आढळतो. या मंदिराचे बांधकाम हेमाडपंथी शैलीचे असले तरी त्यावर कोकणी संस्कृतीचा प्रभाव आढळतो. या मंदिराच्या शिखरावर अनेक शिल्पे आहेत. विशेषत: वेद, भैरू, कामधेनू इ. शिल्पे लक्षणीय आहेत. मंदिरात शिवलिंगाशिवाय पाव्रती मातेचीही मूर्ती आहे. याशिवाय नंदीच्या मागील बाजूस श्री देव मांडलीक मंदिर, समाधी मंदिर तसेच परिसरामध्ये अनेक देवदेवतांची मंदिरे आहेत. मंदिराच्या पूर्वेला डोंगर उतरणीवर इ.स.920 साली गुहा उघडकीस आली आहे. त्याची माहिती या पर्यटन गाईड मध्ये स्वतंत्र दिली आहे.

कोकणातील इतर मंदिराप्रमाणेच छत्रपती शिवाजी महाराजांनी कुणकेश्वर मंदिराला ब-याच वेळ भेटी दिल्याचे संदर्भ आढळतात. त्यांनी या मंदिराच्या जीर्णोध्दारही केला होता. येथे दरवर्षी महाशिवरात्रीला यात्रा भरते.

असे आध्यात्मिक, ऐतिहासिक, नैसर्गिक, पवित्र ठिकाण सौंदर्याने ओतप्रोत भरलेले आहे. हल्ली येथे पर्यटकांचा लोंढा वाढलेला आहे.
या ठिकाणी रहाण्याकरिता भक्त निवास आहे.

श्री दिर्बादेवी मंदिर, जामसंडे
   
देवगड-नांदगांव मार्गावर देवगड एस.टी. स्थानकापासून 3 कि.मी. अंतरावरील जामसंडे गावात 300 वर्षापूर्वीची श्री दिर्बादेवी आणि श्री रामेश्वर अशी दोन मंदिरे एकाच ठिकाणी अतिशय निसर्गरम्य शांत ठिकाणी आहेत. हे जामसंडे-देवगडचे ग्रामदैवत आहे. या ग्रामदेवतांसभोवती नारायण, आदिनाथ गणपती, पावणाई, मारूती, ब्राह्मणदेव हे मंदिर आहेत. मंदिरापर्यंत जाण्यासाठी उत्तम डांबरी रस्ता आहे.

पूर्वी आंतरराष्ट्रीय व्यापारात देवगड बंदराला फार महत्वाचे स्थान आहे. श्रीलंका, ब्रह्मदेश या भागात मूर्तीचा व्यापार होत असे. बहुदा वादळात भरकटलेल्या जहाजावरील कुणा व्यापाराने जहाजावरील बोजा कमी करण्यासाठी किंवा मूर्ती भंजक यवनांपासून मूर्ती वाचविण्यासाठी समुद्रात दडवली असावी. ही मूर्ती गाबीत समाजातील खवळे-ढवळे मंडळींना देवगड-मिठमंबरी समुद्र परिसरात दिर्बादेवी झाले.

श्री देवी दिर्बादेवीची मूर्ती सुषुम्ना स्वरातील असून हातात आयूधे म्हणून एका हातात सुरा व दुस-या हातात तेलाची वाटी आहे. हे एक सुरक्षित मंदिर आहे. मंदिराच्या पाठीमागे 700-800 वर्षांपूर्वीची विष्णूची मूर्ती आहे. या मूर्तीचे नाक ठेचलेले आहे. यावरून शैव व वैष्णव धार्मिक वादाची ही साक्ष आहे हे स्पष्ट होते. देव रामेश्वर हा शैवांचा व वैष्णवांचा देव विष्णु होता. मात्र रामेश्वराची पिंडी पूजतात म्हणून विष्णूची मूर्ती मागील बाजूला आहे. या मूर्तीवरचे विष्णूच्या दशावताराचे कोरीव काम अप्रतिम आहे. जिज्ञासूनी ते जरूरी पहावे. कोकणातील ब-याच देवस्थानात अशा मौल्यवान प्राचीन मूर्ती आहेत.

कान्होजी आंग्रे यांनी दिर्बादेवीला प्रदान केलेली तोफ रामेश्वर मंदिरासमोंर आहे.

हा भव्य परिसर अतिशय रम्य आहे.

दशावतारी नाटके
   
कोकण व गोमंतक येथे सुगीनंतर देवतोत्सवात वा चातुर्मास्यात जत्राप्रसंगी दशावतारी खेळ करण्याची पूर्वापार प्रथा आहे. वेंगुर्ले, सावंतवाडी, मालवण आणि गोवा प्रमाणे देवगड भागातही दशावतारी नाटके लोकप्रिय आहेत.

दशावतारी नाटके मत्स्य, कूर्म, वराह, नरसिंह वामन, परशुराम, राम, कृष्ण, बुध्द व कलंकी (कल्की) या भागवान विष्णुच्या दहा अवतारांवर आधारित असतात. तथापि ही सर्व पात्रे प्रत्यक्ष सभा मंडपात (रंगमंचावर) येत नाहीत. त्यातील काही प्रत्यक्ष रंगमंचावर येतात, तर काहींचा केवळ उल्लेखच केला जातो. या लोककलेचे वैशिष्टय म्हणजे यातील सर्व कलाकार हे पुरुषच असतात.

या नाटकाची सुरुवात मध्यरात्रीला होऊन ते सकाळ पर्यन्त चालते. सर्वप्रथम सूत्रधार रंगभूमिवर येऊन विघ्नहत्या गणपतीला आवाहन करणारे धृपद म्हणतो. संपण्याच्या सुमारास रिध्दी-सिध्दीसहित गणपती रंगमंचावर येतो. त्याच्या मागोमाग सरस्वती येते. गणपतीचे आवाहन संपले की, सुत्रधार सरस्वतीची स्तुती करतो. सरस्वती त्याला आशीर्वाद देते यानंतर प्रतयक्ष खेळाला सुरूवात होते. नाटक सुरू होण्यापूर्वी पउद्यामागे धुमाळ म्हणजे गायन होते. नंतर मंगलाचरण व त्यावर गणपती-सरस्वतीचा प्रवेश असा क्रम असतो. पुढे वरयाचना व वरदान इ. प्रकारानंतर बह्मदेवाचा प्रवेश, संकासुराचे वेदचौर्य व विष्णूकडून त्याचे पारिपत्य इ. कथाभाग होतो. या नंतर मात्र पुढचे सर्व कथाप्रसंग गाळून एकदम गोपी-कृष्णाच्या लीला दाखविण्यात येतात. येथे पूर्वरंग संपून उत्तररंगाला प्रारंभ होंतो. त्यात एखाद्या पौराणिक कथेचे आख्यान असते. सूत्रधार आपल्या पद्यांतून कथानकाच्या विकासक्रम दाखवितो, तर पात्रे आपापली भाषणे स्वयंस्फूर्तीने म्हणतात. देव-दावन आणि राजे-राक्षस यांच्या युध्दांची दृष्ये रंगमंचावर दाखविण्यात येतात. राक्षसाच्या प्रवेशाच्या वेळी राळ उडविण्यात येते व तो आरडा-ओरडा करीत तलवारीच्या फेका फेकत रंगमंचावर प्रवेश करतो. देव-दावनांच्या युध्द प्रसंगी मृदंग व झांजा वगैरे वाद्यांचा एकच गजर चालतो. अखेरीस राक्षकांचा पराभव होतो. खेळाच्या शेवटी हंडी फोडून दहीकाला वाटतात व नंतर आरती होऊन खेळाचा शेवट होतो.

देव-दानवांचे युध्द म्हणजे दशावतारी नाटकातील प्रमुख आकर्षण, राक्षसाच्या प्रवेशाच्या वेळी राळेचा भपकारा उडवीत व त्याचे सैन्य समोरच्या बाजूने प्रेक्षकांच्या गर्दीतून येतो. त्यांची ती भयानक रौद्र रूपे, अललर्डुरच्या आरोळया, हातातील लखलखणा-या तलवारी व रोळेचा उसळलेला डोंब यामुळे प्रेक्षकांची दाणादाण उउते. शेवटी आख्यानानंतर पहाटेच्या सुमारास गौळणकाला (गोपाळकाला) होतो. त्यावेळी नाटकातील स्रीवेषधारी पात्र हातात आरती घेऊन ती प्रक्षकांत फिरवितो. प्रेक्षकही आरतीत पैसे टाकतात. जत्रेतील नाटकाचा शेवट गौळणकाल्याने होत असल्यामुळे त्याला दहिकाला असेही म्हणतात.

देवगड तालुक्यात श्री सद्गुरू दशावतार नाट्य मंडळ, मोर्वे ( प्रमुख- श्री सत्यवान कांदळगांवकर), श्री भूतेश्वर दशावतार नाट्य मंडळ, खुडी (प्रमुख श्री. महेश पाडावे) आणि श्री भगवती दशावतार नाट्य मंडळ, कोटकामते (प्रमुख श्री. नारायण हिंदळेकर) ही मंडळे दशावतार नाटकांची पंरपरा जोपासत आहेत.
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

Other Activities In Devgad

  •   31th  December Beach Festival
  •   Food Festival
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

Famous In Devgad

Alphonso Mango (Devgad Hapus)

Alphonso mango is the unique speciality of Devgad. The soil here produces the best mango and other local fruits such as jackfruit and cashew that are exported globally. In India Mango is also termed at the king of all fruits.

Nivant arranges guided educational tour to the mango and fruit plantations / pulp factory.

देवगड तालुक्यातील आंबा उत्पादन - देवगड हापूस आंबा

हिंदुंच्या अनेक धार्मिक विधीत आंब्यांची पाने, मोहोर आणि फळे पवित्र व आवश्यक मानतात. आंबा हे पौष्टिक, चवदार, आणि औषधी फळे आहे. भरपूर सावली, त्याप्रमाणगे जळाऊ आणि इमारतीसाठी लाकूड देणारा हा वृक्ष आहे.

भारतात आंब्यांची लागवड सुमारे 4000 वर्षांपासून होत आहे. एकट्या भारतात 1000 च्या वर जाती आहेत. या पैकी हापूस ही जात सर्वश्रेष्ठ आहे.

भारतात हापूस उत्तर प्रदेश, बिहार, कर्नाटक, महाराष्ट्र, तामिळनाडू, या राज्यात मोठया प्रमाणात पिकतो. हापूस आंब्याला संपूर्ण दक्षिण कोकण किनारपट्टी उत्तम असली तरी देवगड परिसरातील हापूस आंबा हा देवगड हापूस या नावाने भारतात प्रसिध्द आहे.

देवगड भागात वर्षाला एका हापूस कलमाला 1000 पर्यंत फळे येतात आणि हा जा्गतिक उच्चांक आहे. मात्र दरवर्षी फळे येत नाहीत. ती एक वर्ष आड येतात. पायरी किंवा गावठी आंब्याला यापेक्षा अधिक फळे येतात्. आंबा साधारणपणे मोहोर आल्यापासून 4 महिन्यांनी पक्व होतो.

सध्या देवगड हापूस चव, रंग, वजन आणि टिकाऊपणा याबाबत जगप्रसिध्द लंडन आणि न्यूयॉर्क येथील आंब्याशी स्पर्धा करत आहे. देवगड तालुक्यात, सर्वत्र हापूस आंब्याच्या बागा आहेत. सडा भागात विरळ झाडे आहेत. तर खाडी किनारी खार भूमीत पाडा पोफळीचे प्रमाण अधिक आहे. उतरत्या आणि पाण्याचा निचरा होणा-या जमिनीत हापूस आंबा उत्तम पिकतो. या तालुक्यातील 35% लोक या व्यवसायात गुंतलेले आहेत. येथे 25 हून अधिक आंबा वहातूक कंपन्या आहेत. हंगामात दिवसा सुमारे 50 ट्रक आंब्याचे उत्पादन निघते. केवळ हापूस आंब्याची देवगड तालुक्यातील वार्षिक उलाढाल रू. 450 कोटीची आहे.

 

मत्स्य व्यवसाय

भारतातील 9 राज्ये एकूण समुद्रकिनारी असून एकूण किनारपटटीची लांबी 7,517कि.मी. आहे. महाराष्ट्राच्या किनारपटटीची लांबी 720 कि.मी. आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या किनारपट्टीची लांबी 121 कि.मी. आहे. देवगड, विजयदुर्ग, तारामुंबरी, मिठमुंबरी, कातवण, तांबळडेग येथे मच्छिमार केंद्रे आहेत. या ठिकाणी समुद्रातील मासेमारी चालते. त्याचप्रमाणे वाघोटन, वाडातर, मुंबरी, तांबळडेग येथील खाडयांध्येही मासेमारी चालते.
येथे सुमारे 200 ट्रॉलर्स आणि 350 होड्या आहेत. या तालुक्यात सतरा ठिकाणी रापण पध्दतीने मच्छिमारी होती. मात्र सध्या यांत्रिक बोंटींच्या मोठया प्रमाणातील शिरकावामुळे आता फक्त तारामुंबरी, कातवण आणि तांबळडेग येथे काही प्रमाणात रापण पध्दतीने मासेमारी केली जाते. येथे दरवर्षी 7000 टनहून अधिक मासळी मिळते. वार्षिक उलाढाल 125 कोटी रूपयापेक्षा अधिक होत असून तालूक्यातील सुमारे 20% लोक या व्यवसायाशी निगडीत आहेत. विजयदुर्ग आणि देवगड येथेे नैसर्गिक सुरक्षित बंदरे असून येथे माशांची मोठया प्रमाणात खरेदी-विक्री होते.

या परिसरात पापलेट बांगडा सारंगा, कोळंबी, म्हाकूल, मुशी, बोंबील, ढोमा, रावस शेवंउ, बगळी, शिंगाळा, शेंगटी, बळा, सुरमई, तारली, पेडवे, कापी, लेपी, राणामासा, सौंदाळा, वाम इत्यादी प्रकारचे मासे मोठया प्रमाणात मिळतात. खाडीतील मुळे, तिसरे (इसरक्या/शिवल्या), कालवे यांचाही व्यवसाय चालतो. हंगामानूसार खेकडे ही मिळतात. माशांची लिलाव पध्दतीने खरेदी विक्री आनंदवाडी जेटी येथे केली जाते.

 
         Guest Book          Photo Gallery         Tell-A-Friend
    
     Mobile : +91-7038709369   |   9423369557 © Nivant Resort, Devgad, Kontan. Developed by  Softkey Solutions.