AC / Non AC Rooms
--------------------------------------
Veg / Non Veg Food Available
--------------------------------------
Rent a Car Facility
Plan Your Tour
Festivals in Konkan
   
Konkan Tourist Guide
----------------------------------------------------------------------------------------------------------
<< Back
आनंदवाडी जेटी
   
देवगड एस.टी. स्थानकापासून 1 किमी. अंतरावर देवगड जुने बंदर आणि देवगड गाव यांच्यामध्ये असणा-या खाडीत, अतिशय अत्याधुनिक जेटीचे काम चालू आहे. हा देवगडचा एक भाग आनंदवाडी या नावाने ओळखला जातो. म्हणून हिला आनंदवाडी जेटी म्हणतात. सध्या मासळीचा लिलाव येथेच होतो. तसेच बिगर हगामात येथे मच्छिमारी नौका बाहेर काढून अथवा नांगरून ठेवल्या जातात. येथे सुरमई, झिंगा/कोळंबी, पापलेट, सरंगा, रिबन फिश, म्हाकूल, स्फटल फिश या जातीचे मासे मोठया प्रमाणात मिळतात.

मोठया मच्छिमारी बोटी खाडीत थांबून त्यातील मासळी लहान-लहान होडयांनी/पातींनी किनारी आणणे, लहान होडीतील मच्छी हाताने टोपलीतून किना-यावरील वाळूवर आणणे, त्यांची लिलाव पध्दती, त्या अन्ाुषंगाने येथील इतर व्यवसाय हे मच्छिमारी हंगामात दररोज चालणारे दृश्य पहाण्यासारखे आहे. मच्छिमार हंगामात (ऑक्टोबर ते मे ) दररोज सायेकाळी 4 ते रात्री 8 पर्यंत येथे अवश्य भेट द्यावी.
मात्र ही पारंपारीक मच्छिमारी पध्दत आता बदलणार आहे. दहाव्या पंचवार्षिक योजनेत कोकण किनारपटटीपरील 720 कि.मी. अंतरातील महत्वाच्या बंदराचा विकास करण्याचा राज्य सरकारने इ.स.2006 मध्ये निर्णय घेतला आहे. त्यात देवगड येथील आनंदवाडी जेटी चा समावेश आहे. सेंट्रल इन्स्टिटयुत ऑफ कोस्टल इंजिनियरींग फिशरीज, बेंगलोर या संस्थंने इ.स. 1983 मध्ये या ठिकाणी पहाणी करून 185 दशलक्ष अंदाजित ख्ार्चाचा अहवाल बनविला होता. आता तो अंदाजित खर्च दुप्पट झाला आहे. सध्या या साठी शासनाने 30 कोटी रूपयाची तरतूद केली असून यात केंद्र सरकारचा 50% वाटा आहे. हा एक मॉडेल प्रोजेक्ट म्हणून केला जात आहे.

येथे 250 हून अधक ट्रॉलर्स असून तितक्याच पाती मत्स्य व्यवसायात गुंतल्या आहेत. दोन पर्सिनल नेट ट्रॉलर्सही आहेत. येथे स्थानिक आणि बाहेरचे मिळून 10 ते 15 हजार लोकांची वस्ती आहे. हे सर्व या व्यव् येथे वार्षिक सरासरी 10 ते 15 लाख टन मत्स्य उत्पादन केले जाते. देवगडमध्ये चार मत्स्य सहकारी संस्था आहेत.

या आनंदवाडी जेटी प्रकल्पामध्ये मच्छी उतरवून येण्यासाठी धक्क्याची निर्मिती, बोटी नांगरणे आणि शाकारणे यासाठी स्वतंत्र धक्के आणि त्यासाठी सुविधा, मत्स्य प्रक्रिया केंद्रे, विक्री केंद्रे, शीतगृह, प्रशिक्षण केंद्रे, अग्निशामक यंत्रणा, दूरवाणी केंद्रे, नांगरणी धक्के, बोटी बाहेर काढण्यासाठी धक्के, इंजिन दुरूस्ती, मळनि:सारण केंद्रे, पॅकेजिंग युनिट, बर्फ निर्मिती कारखाना, मत्स्य साठवणूक केंद्र, कॅनिंग, फिश मिल प्लँट, फिश ऑईल निर्मिती कारखाना, जाळे विणणे आणि दुरूस्ती करणे, बोट बांधणी आणि दुरूस्ती कार्यशाळा, रेडिओ, दळणवळण, देखभाल, दुरूस्ती कार्यशाळा, विश्रांती गृहे, इंधन सुविधा, पार्किंग सुविधा, स्वच्छता गृहे, अप्रोच रेड आणि अंतर्गत वहातूक, इलेक्ट्रीक पॉवर हाऊस, विविध कार्यालये इ. सोयी असणार आहेत. येथे जलतरण सुविधा उपलब्ध होणार आहे.

येथील देखावा अप्रतिम आहे. हा भारतातील पहिलाच अत्याधुनिक प्रकल्प होणार आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पर्यटकांना गोवा किंवा जम्मू-काश्मिरला मुळीच जावे लागणार नाही.
<< Back
 
         Guest Book          Photo Gallery         Tell-A-Friend
    
     Mobile : +91-7038709369   |   9423369557 © Nivant Resort, Devgad, Kontan. Developed by  Softkey Solutions.