AC / Non AC Rooms
--------------------------------------
Veg / Non Veg Food Available
--------------------------------------
Rent a Car Facility
Plan Your Tour
Festivals in Konkan
   
Konkan Tourist Guide
----------------------------------------------------------------------------------------------------------
<< Back
गणेशोत्सव
   
कोकणी आणि सण यांच नात अगदी अतूट आहे. प्रत्येक सण कोकणात मोठया उत्साहाने, भक्तीभावाने आणि विधीवत साजरा केला जातो. कोकणात दिवाळी, तुळशी विवाह, शिमगोत्सव, गणेशोत्सव,नारळी पोर्णिमा, स्थानक जत्रोत्सव फार मोठया प्रमाणात साजरे केले जातात. यातील सर्वात मोठा कित्यंक दिवस घरादाराचे रंगरुप बदलणारा एक आगळवेगळा सण गणेशोत्सव !

गणेशोत्सव कालावधीत घराघरात चैतन्याचे आणि मंगलमय वातावरण असते. गणेश पूजनाचे ठिकाण ठरलेले असते. किंबहुना घर बांधते वेळीच तशी सोय केलेली असते. बरेच गणपती हे घराण्याचे किंवा भावकीचे गणपती असतात. विभाक्त कुटुंबे असली किंवा नोकरी धांद्यानिमित्त वेगवेगळया ठिकाणी स्थायिक झाली असली तरीसुध्दा आपले मुळघर मानून सर्व गणेशोत्सवासाठी अमाप पैसा खर्च केला जातो. वर्गणी काढून किंवा आळीपाळीने प्रत्येक वर्षी गणेर्शोत्सव धुमधडयाक्यात साजरा केला जातो. बाप्पाच्या ससजावटीची, मुर्तीची, नैवेद्याची कमतरता भासू दिली जात नाही. गणपती पाहण्याचे निमंत्रण दिले जाते. वाडया-वाडयांतून आणि गावोगावी गणपती आणि त्यावेळी केलेली आरास पाहण्याचा कार्यक्रम आठ दिवस चालूच असतो. येणा-यांना प्रसाद म्हणून करंज्या दिल्या जातात.

गणेशमूर्ती बनविण्याचे काम सहा महिने आधीच सुरु होते. गणेशमूर्ती बनविण्याच्या उद्योगाला कोकणात गणपतीची शाळा म्हणतात. या व्यवसायासाठी किती नविन्य पूर्ण शब्द वापरला आहे. यावरुन लोकांची गणपती विषयी भावना दिसून येते. या कालखंडात गणपतीची शाळा गजबजून गेलेल्या असतात. तयार गणपतीची मूर्ती फार कमी लोक घेतात. आपल्या पसंती आणि कुवतीनुसार प्रत्येक वर्षी नवीन गणेशमूर्ती आणली जाते. त्यासाठी वर्णन, चित्र, कॅलेंडर, फोटो इत्यादि स्वत:कडील पाटासह कलाकाराकडे दिले जाते. प्रत्येकाच्या मागणीनुसार गणपतीची मूर्ती मूर्तीकार बरवितात. चतुर्थीच्या आधी आठ-दहा मूर्तीना रंगकाम सुरु होते. पूर्वी ब्रशने रंगकाम केले जाई. आता स्प्रे पेंटींग केले जाते. मात्र लहान-लहान नाजूक कामे हाताने केली जातात. अशी प्रत्येक गावात एकतरी गणपतीची शाळा आहेच. साधरपणे 500 रुपयापासून 5 हजार रुपयांपर्यनत घरगुती गणपतीचच्या किंमती असतात.

आनंदी वातावरणात गणपती प्रतिष्ठापना ठिकाणची साफसफाई केली जाते रंग रंगोटी केली जाते. भिंतीवर उत्साही चित्रे काढली जातात.हल्ली डिजीटल बॅनर मिळतात, बजेटप्रमाणे मखर व आसन केले जाते.

कोकणातील बरीचशी मंळळी नोकरीनिमित्त मुंबई किंवा इतरत्र असल्याने त्यांची घरे बंद असतात. मात्र गणेशोत्सव काळात एकही घर बंद नसते. किंबहुना अशी मंडळी आठ दिवस अगोदर गावी येतात. गावातील बाजारपेठाही सजल्या जातात. पुजेचे, मंडपाचे, आराशीचे साहित्य, तोरणे, मखरे, फळे, रंग, फटाके, रिबन इत्यादी साहित्याची दुकानात विजेच्या प्रकाशात रेलचेल सुरु असते. सजवलेली दुकाने रात्री उशीरापर्यन्त उघडी असतात. घराघरात सजावट रात्रभर सुरु असते.

प्रत्येक घरात या काळात चैतन्याचे वातावरण असतसे. सर्वजण समरसतेने काम करतात. गणपतीची प्रतिष्ठापना केल्यावर खीर-मोदकांचे नैवेद्य, आरत्या, भजने असे कार्यक्रम सुरु होतात. सवजण गणरायाच्या सेवेत कग्न असतात. वाडी-वाडीत भजने होतात. सामुदायिक आरत्या होतात. अनंत चतुदर्शीपर्यन्त मंगलमय वातावरण असते. गणेशमुर्तीचे विसर्जनही मोठया थाटामसटात केले जाते.

<< Back
 
         Guest Book          Photo Gallery         Tell-A-Friend
    
     Mobile : +91-7038709369   |   9423369557 © Nivant Resort, Devgad, Kontan. Developed by  Softkey Solutions.